Havaman Andaj  : पुढील चार दिवस महाराष्ट्र, कोकण, विदर्भात मुसळधारचा अंदाज !

Ahmednagarlive24 office
Updated:
Maharashtra Havaman Alert

Havaman Andaj  : राज्यात मान्सून सक्रिय असून पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या अनेक भागांत ऑरेंज व यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, सोमवारी राज्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस झाला.

‘बिपरजॉय’ चक्रीवादळ निवळल्यानंतर मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू झाला आहे. रविवारी महाराष्ट्र व्यापल्यानंतर मान्सूनने सोमवारी देशाच्या आणखी काही भागांत प्रगती केली. उत्तर अरबी समुद्राच्या आणखी भागात तसेच गुजरात, राजस्थान, हरयाणा आणि पंजाबच्या आणखी काही भागात मान्सून दाखल झाला. तसेच जम्मू-काश्मीर आणि लडाखचा उर्वरित भाग मान्सूनने व्यापला. मान्सूनची सीमा पोरबंदर, अहमदाबाद, उदयपूर, नरनाऊल, फिरोजपूरपर्यंत होती.

सोमवारी राज्यात सायंकाळपर्यंत कोकण भागातील सांताक्रुझमध्ये २७ मिमी, डहाणू ५८, रत्नागिरी ०.२ मिमी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये १३ मिमी, पुणे ०.४, जळगाव ३, कोल्हापूर ४, नाशिक २, सातारा ०.७, तर सांगलीमध्ये ०.३ मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये ८, उस्मानाबाद १, परभणीमध्ये १ मिमी पाऊस बरसला आहे.

विदर्भातील बहुतांश भागात जोरदार पाऊस पडला आहे. ब्रह्मपुरीत २० मिमी, गोंदिया १८, अकोला ५, अमरावती १, चंद्रपूर २, तर बुलढाण्यामध्ये २ मिमी पावसाची आकडेवारी नोंदवली आहे.

मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात मुसळधारचा अंदाज ठिकठिकाणी पावसाची हजेरी

मान्सूनने मागील दोन दिवसांमध्ये वेगाने प्रवास केला. मान्सून पुढील दोन दिवसांमध्ये गुजरातच्या आणखी काही भागांत दाखल होईल. तसेच राजस्थानच्याही आणखी काही भागांमध्ये, पंजाब आणि हरयाणाचा उर्वरित भागांमध्ये मान्सूनचा प्रवास होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe