Panjab Dakh : पंजाब डख हे आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. शेतकरी सांगतात की, डख यांचा हवामान अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरतो. यंदा मात्र डख यांच्या मान्सून आगमना बाबतचा अंदाज फोल ठरला होता.
विशेष बाब म्हणजे यंदा भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाला देखील मान्सूनने चकवा दिला आहे. मात्र आता राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. काल अर्थातच 11 जून 2023 रोजी मान्सूनचे दक्षिण कोकणात अर्थातच तळ कोकणात आगमन झाले आहे.
शिवाय पुढील 48 तासात मान्सून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान आज आपण पंजाब डख यांनी दरवर्षी कोणत्या तारखांना महाराष्ट्रात हमखास पाऊस पडतो यासंदर्भात दिलेल्या माहिती विषयी जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा :- पाऊस केव्हा आणि किती पडणार याबाबत पशु-पक्षी देतात ‘हे’ संकेत; वाचा याविषयी सविस्तर
कोणत्या तारखांना पडतो पाऊस?
पंजाब डख सांगतात की, दरवर्षी शेतकऱ्यांची जून अखेरपर्यंत म्हणजे 27 ते 28 जून पर्यंत पेरणी होत असते. म्हणजेच दरवर्षी 27 ते 28 जून पूर्वी राज्यात जवळपास सर्वत्र पाऊस पडून जातो.
जर समजा राज्यात जून अखेरपर्यंत पाऊस झाला नाही तर 10 जुलैपासून ते 15 जुलै पर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यात, सर्व गावात पाऊस हजेरी लावत असतो. डख सांगतात की या कालावधीमध्ये दरवर्षी पंढरपूरची वारी असते. आणि वारीला दरवर्षीच पाऊस पडतो.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो, सर्पदंश झाला तर घाबरू नका, ‘हे’ काम करा; पण सापाने चावा घेतल्यास ‘या’ गोष्टी करणे टाळा, नाहीतर….
वारी करून वारकरी घरी येतात आणि पावसाला सुरुवात होते असं मत त्यांनी व्यक्त केल आहे. याशिवाय राज्यात 18 जुलै आणि 19 जुलै रोजी नेहमीच पाऊस पडत असतो. हे दोन दिवस राज्यातील जवळपास 80 टक्के भागात दरवर्षी पाऊस पाहायला मिळाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
याशिवाय 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान राज्यात नेहमीच पाऊस झाला आहे. म्हणजेच या तारखेला दरवर्षी राज्यात पाऊस पडतो असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. यामुळे यंदा देखील या तारखांना खरंच पाऊस पडणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.
हे पण वाचा :- धक्कादायक ! महाराष्ट्र पुन्हा हादरला; पाच महिन्यातील शेतकरी आत्महत्येची ‘ही’ आकडेवारी काळीज पिळवटणारी, शासन केव्हा जाग होणार?