Panjab Dakh : भारतीय हवामान विभागाने अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून येत्या दोन दिवसात या कमी दाब्याच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या चक्रीवादळामुळे गुजरात आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा वाहणार असून वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या महत्वपूर्ण माहितीनुसार, या चक्रीवादळामुळे आज अर्थातच 6 जून 2023 आणि उद्या म्हणजेच सात जून 2023 ला गुजरात मधील बनासकांठा, साबरकांठा, अरवली जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यासोबतच पाटण, मोडासा, मेहसाणासह इतर भागातही पावसाचा इशारा IMD ने दिला आहे. गुजरात समवेतच आपल्या राज्यात प्रामुख्याने मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा आणि पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
निश्चितच यामुळे या संबंधित भागातील सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना अधिक सजग आणि सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी देखील अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
तसेच डख यांनी या चक्रीवादळामुळे मान्सूनसाठी पोषक हवामान तयार होत असल्याचे मोठे भाकीत देखील वर्तवल आहे. डख यांच्या मते हे चक्रीवादळ राज्यात मान्सून घेऊन येणार आहे.
तसेच त्यांनी राज्यात मान्सूनचे आगमन 8 जूनला होणार असून 7 जुनपासून ते 11-12 जून पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. 13 आणि 14 जूनला मात्र पावसाची उघडीप राहणार आहे. पण 15 जून नंतर पुन्हा पावसाला सुरवात होईल आणि 20 जून पर्यंत राज्यात पाऊस होणार आहे.
हे पण वाचा :- सावधान ! अरबी समुद्रात तयार होतंय बायपरजॉय चक्रीवादळ; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात वादळी पाऊसाचा धोका, हवामान विभागाचा इशारा
16-17 पासून मान्सूनची तीव्रता वाढणार आहे. २० जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. एवढेच नाही तर जून अखेरपर्यंत राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील असे देखील भाकीत त्यांनी यावेळी वर्तवल आहे. एकंदरीत अरबी समुद्रातील चक्रीवादळ मान्सूनला सोबत घेऊन येणार असल्याचा दावा डख यांनी केला असल्याने आता हा दावा कितपत खरा ठरतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
भारतीय हवामान विभागाने काय म्हटले?
हवामान विभागाने मात्र मान्सूनचे आगमन येत्या तीन ते चार दिवसात केरळात होईल असं सांगितले आहे. म्हणजे 8-9 जूनच्या आसपास केरळ मध्ये मान्सून दाखल होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच त्यानंतर जवळपास पाच ते सहा दिवसात अर्थातच 13 ते 14 जूनच्या दरम्यान राज्यात मान्सूनची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. मान्सून आगमना बाबत मात्र स्थिती अजूनही अस्पष्टच आहे.
हे पण वाचा :- ये रे ये रे पावसा….! मान्सून पुन्हा लांबणीवर; महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी होणार मान्सूनचे आगमन, वाचा हवामान विभागाचा अंदाज