‘या’ तारखेपासून पुन्हा मुसळधार पाऊस, पंजाबरावांचा नवीन अंदाज पाहिलात का ?

पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे या संबंधित जिल्ह्यांमध्ये 12 सप्टेंबर पर्यंत पाऊस पडणार आहे. मात्र 12 तारखे नंतर पाऊस विश्रांती घेईल. महाराष्ट्रात जवळपास 23 सप्टेंबर पर्यंत कुठेच पाऊस पडणार नाही. म्हणजेच राज्यात 10-11 दिवस पावसाची उघडीप राहणार आहे.

Published on -

Panjab Dakh News : आजपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस पडणार मात्र तदनंतर पाऊस विश्रांती घेणार आहे. पंजाबराव डख यांनीच हा नवीन अंदाज जाहीर केला आहे. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 सप्टेंबर पर्यंत राज्यातील नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, परभणी, हिंगोली वर्धा, वाशिम, संभाजीनगर, जालना, मनमाड, मालेगाव, जळगाव, नाशिक, बुलढाणा, अमरावती, अकोला या पट्ट्या चांगल्या पावसाची शक्यता आहे.

मात्र 13 तारीख उजाडली की पावसाची तीव्रता कमी होणार आहे. खरे तर सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. दोन दिवसांपूर्वी हे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते आणि काल हे डीप डिप्रेशन अधिक तीव्र झाले.

याचा प्रभाव म्हणून महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये काल मुसळधार पाऊस झाला. हवामान खात्याने आज सुद्धा राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाब रावांनी देखील असाच अंदाज दिला आहे.

पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे या संबंधित जिल्ह्यांमध्ये 12 सप्टेंबर पर्यंत पाऊस पडणार आहे. मात्र 12 तारखे नंतर पाऊस विश्रांती घेईल. महाराष्ट्रात जवळपास 23 सप्टेंबर पर्यंत कुठेच पाऊस पडणार नाही.

म्हणजेच राज्यात 10-11 दिवस पावसाची उघडीप राहणार आहे. मात्र पावसाची ही उघडीप शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे. खरे तर राज्यातील प्रमुख सोयाबीन उत्पादक पट्ट्यातील सोयाबीनचे पीक आता हार्वेस्टिंग साठी तयार झाले आहे.

येत्या काही दिवसांनी प्रत्यक्षात सोयाबीनची हार्वेस्टिंग सुरू होणार आहे. अशा या परिस्थितीत जर पाऊस थांबला तर शेतकऱ्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे. दरवर्षी सोयाबीन हार्वेस्टिंगच्या वेळी महाराष्ट्रात मोठा पाऊस पडत असतो.

या पावसामुळे मात्र सोयाबीन उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यंदा मात्र सोयाबीन काढण्यासाठी पाऊस विश्रांती घेणार असे दिसत आहेत. याचा फायदा हा मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील प्रमुख सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना होणार आहे.

दरम्यान पंजाब रावांनी ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक अंतिम टप्प्यात आले असेल त्यांनी पावसाची विश्रांती दिसल्याबरोबर सोयाबीनची हार्वेस्टिंग करून घ्यावी असा सल्ला दिला आहे.

कारण की 22 आणि 23 सप्टेंबरला पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असा अंदाज आहे. 22 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe