Panjabrao Dakh Havaman Andaj : मोसमी पावसाचा मध्यंतरी दहा दिवसाचा खंड पाहायला मिळाला. महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा खंड पडला होता. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र 20 जून नंतर परिस्थिती बदलली आणि राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. 23-24 जून च्या सुमारास राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला.
यानंतर मात्र पुन्हा पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. अनेक ठिकाणी अजूनही मुसळधार पाऊस झालेला नाही. नागपूर शहरासह जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानंतरही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.
अशातच, ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे.
आज 29 जून आणि उद्या 30 जून 2024 ला राज्यातील उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र कोकण मराठवाडा पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ या भागात भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, बुलढाणा, परभणी, जालना, बीड, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, कोकण या भागांमध्ये चांगला जोरदार पाऊस होणार अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
उर्वरित राज्यात देखील पावसाची शक्यता आहे. मात्र पावसाचा जोर हा कमी राहणार आहे. दरम्यान पुढील महिन्यातही पंजाब रावांनी चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील महिन्यात अर्थातच जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यात राज्यात चांगला पाऊस होणार असा अंदाज डख यांनी वर्तवला आहे.
डख यांनी सांगितल्याप्रमाणे चार जुलै 2024 नंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर हा थोडा कमी झाला आहे. यामुळे, राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.
मात्र, डख यांनी आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.