Panjabrao Dakh Havaman Andaj : जून महिन्याचा सेंड ऑफ झाला आहे. आज पासून जुलैला सुरुवात झाली आहे. पावसाळ्याच्या दुसऱ्या महिन्याला सुरुवात झाली मात्र अजूनही राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. मात्र काही भागात अजूनही म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही.
यामुळे तेथील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशातच, आता पंजाबरावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. खरंतर जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे.
दरम्यान, पंजाबरावांनी जुलै महिन्यात चांगला पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे एक, दोन, तीन जुलै रोजी महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहणार आहे.
यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमधील सर्व आवश्यक कामे आवरून घ्यावीत. कारण की यानंतर राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
महाराष्ट्रात चार जुलैपासून अगदी मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. काही ठिकाणी ओढे नाले भरून वाहतील असा पाऊस पडणार आहे.
किती दिवस मुसळधार पाऊस पडणार ?
पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे, चार जुलैपासून ते 10 जुलै पर्यंत राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात 27 ते 30 जून दरम्यान महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे.
आता जुलैमधेही खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. चार जुलैपासून पावसाला सुरुवात होणार आहे आणि त्यापुढील सहा-सात दिवस राज्यात पाऊस पडणार आहे.
या कालावधीत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोरदार पाऊस पडणार आहे. पावसाची तीव्रता अधिक राहणार असल्याने या काळात छोटी-मोठी तळे देखील भरण्याची शक्यता आहे.
पंजाबराव सांगतात की, ज्या वर्षी पूर्वेकडून पाऊस येतो त्यावर्षी अहमदनगर, बीड, सोलापूर, लातूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ सहित संपूर्ण महाराष्ट्रात चांगला जोरदार पाऊस पडत असतो.
यावर्षी पूर्वेकडूनच पाऊस दाखल झाला आहे यामुळे महाराष्ट्रात चांगला जोरदार पाऊस होणार आहे. यानुसार चार जुलै ते 10 जुलै दरम्यान राज्यात चांगला जोरदार पाऊस होणार असून यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.