पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज, आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार, कसं राहणार आगामी 5 दिवसाच हवामान ?

हवामान खात्याप्रमाणेच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील आगामी काही दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात एक सप्टेंबर ते 5 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Tejas B Shelar
Published:

Panjabrao Dakh Havaman Andaj : गेली काही दिवस विश्रांती वर असणारा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट अन काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

हवामान खात्याप्रमाणेच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील आगामी काही दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात एक सप्टेंबर ते 5 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.

यावेळी मराठवाड्याकडून पावसाला सुरुवात होणार आहे. सर्वप्रथम मराठवाड्यातील नांदेड, परभणी मध्ये पावसाला सुरुवात होईल आणि त्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे.

या काळात राज्यात वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि खानदेशात या कालावधीत जोरदार पाऊस पडणार असा अंदाज आहे.

प्रत्येक विभागात पावसाचा दोन-दोन दिवसाचा मुक्काम राहणार असा अंदाज आहे. त्यामुळे आगामी काही दिवस शेतकरी बांधवांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

सध्या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मका यांसारखें विविध पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. अशा या महत्त्वाच्या अवस्थेत खरीप हंगामातील पिकांची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बरसणार पाऊस

पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे, राज्यातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, जळगाव, धुळे, नंदुरबार, मुंबई, नाशिक, अहमदनगर, पुणे, हिंगोली, परभणी, अमरावती, अकोला, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार असा अंदाज आहे. एकंदरीत महाराष्ट्रात सगळीकडे जोरदार पाऊस होणार अशी शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe