Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार असा अंदाज समोर आलाय. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हा अंदाज जारी केला आहे.
गेल्या महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुद्धा झाला. काही ठिकाणी पूरस्थिती सुद्धा तयार झाली. अतिवृष्टी झाल्याने खरीपातील शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले.

दरम्यान आता मान्सून अंतिम टप्प्यात आला असून अशातच पंजाबराव डख यांनी एक नवीन अंदाज दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान कोरडे आहे पण लवकरच राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे.
काही ठिकाणी तर आज पासूनच पावसाला सुरवात होणार असल्याचा अंदाज डख यांनी दिला आहे. अशा स्थितीत आता आपण डख यांनी राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे, राज्यात पावसाची तीव्रता कधीपासून वाढणार याबाबतची अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मराठवाडा – नांदेड, उमरखेड, किनवट या भागात आजपासून 18 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे. तसेच लातूर, नांदेड, परभणी, बीड, हिंगोली भागात 13 सप्टेंबर पासून अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. जवळपास 18 सप्टेंबर पर्यंत या भागात पाऊस कायम राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र – अहिल्यानगर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे या भागात 13 तारखेपासून पाऊस सुरू होईल. जवळपास 18 सप्टेंबर पर्यंत या भागात पाऊस पडत राहील.
विदर्भ – या भागात 12 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे. पण पावसाची तीव्रता 14 तारखेपासून वाढेल. येथे सुद्धा 18 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आलाय.
कोकण – मुंबई पालघर ठाणे या भागात 13 तारखेपासून पाऊस झाला सुरुवात होणार आहे. या भागात सुद्धा 18 तारखेपर्यंत पाऊस पडेल असा अंदाज आहे.