महाराष्ट्रात ‘या’ 10 दिवसांच्या काळात पाऊस विश्रांती घेणार ! पंजाबरावांचा सप्टेंबर महिन्यातील सुधारित हवामान अंदाज

डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 सप्टेंबर पर्यंत राज्यातील नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, वर्धा, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, मालेगाव, नाशिक, मनमाड, बुलढाणा, अमरावती, अकोला या पट्ट्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे.

Tejas B Shelar
Published:

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार या संदर्भात या नवीन हवामान अंदाजात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात आता 12 सप्टेंबर पर्यंत राज्यातील काही मोजक्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

तसेच 12 सप्टेंबर नंतर आणि जवळपास 22 ते 23 सप्टेंबर पर्यंत म्हणजेच दहा ते अकरा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची विश्रांती पाहायला मिळणार आहे. आता आपण आजपासून 12 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत.

डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 सप्टेंबर पर्यंत राज्यातील नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, वर्धा, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, मालेगाव, नाशिक, मनमाड, बुलढाणा, अमरावती, अकोला या पट्ट्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे.

मात्र तदनंतर या पट्ट्यातूनही पाऊस गायब होणार आहे. 12 सप्टेंबर नंतर संपूर्ण महाराष्ट्रातून पाऊस गायब होईल असा अंदाज आहे. तदनंतर दहा ते अकरा दिवस म्हणजेच जवळपास 22 ते 23 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात कुठेच पाऊस होणार नाही.

दुसरीकडे वर सांगितलेल्या जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात आज पासूनच पावसाची उघडीप राहणार आहे. यामुळे हा काळ राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूपच फायद्याचा ठरणार आहे. हा काळ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याचा राहील.

कारण की आता राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सोयाबीन हार्वेस्टिंग साठी तयार झाले आहेत. दरवर्षी सोयाबीन हार्वेस्टिंग च्या वेळी राज्यात पाऊस होतो आणि यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असते. मात्र यंदा सोयाबीन काढणी दरम्यान राज्यात पावसाची विश्रांती राहणार असल्याचा दावा पंजाब रावांनी केला आहे.

यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे बोलले जात आहे. मात्र असे असले तरी ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन हार्वेस्टिंग साठी रेडी झाले आहेत त्यांनी या काळात सोयाबीन काढून घेणे आवश्यक आहे.

कारण की 22-23 सप्टेंबर दरम्यान पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन हार्वेस्टिंग साठी तयार झाले असतील त्यांनी 12 सप्टेंबर नंतर सोयाबीन काढून घेणे अपेक्षित आहे.

तथापि, स्थानिक वातावरण तयार झाल्यास राज्यात काही भागात उघडीप सांगितलेल्या काळातही पावसाची शक्यता आहे. मात्र या काळात पावसाचा जोर कमी राहणार आहे. याचा शेतकऱ्यांच्या कामांवर कोणताच परिणाम होणार नाही आणि शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe