पंजाबराव डख हवामान अंदाज : ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात कसा राहणार पाऊस ? कुठं पडणार मुसळधार ?

Published on -

Panjabrao Dakh : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात चांगला जोरदार पाऊस झाला आहे. जोरदार पावसाने राज्यातील अनेक भागांमध्ये दाणाफान  झाली आहे. पुणे आणि नाशिक मध्ये तर पूरस्थिती तयार झाली होती. पण आता राज्यातील पावसाचा जोर बराच कमी झाला आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाची उघडीप राहणार असा अंदाज सुद्धा वर्तवला आहे. उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे.

उद्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची उसंत पाहायला मिळू शकते. तथापि शनिवारपासून राज्यातील विदर्भ भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शनिवार, रविवार आणि सोमवारी राज्यातील विदर्भ विभागात जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.

उर्वरित राज्यात मात्र म्हणजेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हे तीन दिवस पाऊस विश्रांती घेणार असा अंदाज आहे. दुसरीकडे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आजपासून दहा तारखेपर्यंत राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पंजाबरावांच्या मते आजपासून पुढील तीन दिवस राज्यात दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. या काळात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असे पंजाब रावांनी म्हटले आहे.

परंतु या काळात विदर्भातील पूर्व आणि पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता अधिक राहू शकते. या काळात राज्यात दररोज भाग बदलत पाऊस पडत राहणार आहे.

म्हणजेच हवामान खात्याने राज्यातील अनेक भागात पावसाची उघडीप राहणार असा अंदाज दिला आहे तर पंजाब रावांनी या काळातही राज्यात पाऊस सुरू राहणार असे म्हटले आहे.

मात्र पंजाबरावांनी 11 ऑगस्ट पासून महाराष्ट्रात सूर्यदर्शन होण्याची शक्यता वर्तवली आहे. 11 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या काळात राज्यात कडक सूर्यदर्शन होणार आहे. या काळात राज्यात पावसाची तीव्रता कमी होणार आहे.

या पाच ते सहा दिवसांच्या काळात राज्यातील धाराशिव, लातूर, बीड, परभणी, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात सूर्यदर्शनाची शक्यता वर्तवली आहे. अर्थातच संपूर्ण मराठवाड्यात या काळात सूर्य दर्शनाची शक्यता आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर मध्ये देखील या काळात सूर्यदर्शन होणार आहे.

मात्र 17 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा हवामानात चेंज पाहायला मिळणार आहे. 19 ऑगस्ट पासून ते 24 ऑगस्ट पर्यंत राज्यात पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणार असे पंजाबरावांनी आपल्या नवीन हवामान बुलेटीन मध्ये स्पष्ट केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe