पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार

गेल्या चार पाच दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकणात अन मध्य महाराष्ट्रच्या घाटमाथा परिसरात पाऊस सुरु आहे, पण तेथे सुद्धा पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज दिला आहे. आता राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार याबाबत त्यांनी माहिती दिली आहे.

Tejas B Shelar
Published:

Panjabrao Dakh News : ऑगस्ट महिना संपत आला आहे. म्हणजे मान्सूनचे 3 महिने पूर्ण झालेत आता फक्त मान्सूनचा एक महिना बाकी राहिला आहे. या 3 महिन्यांच्या काळात राज्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टीसारखा पाऊस झाला आहे.

या महिन्याच्या सुरवातीला सुद्धा जोरदार पाऊस झाला. पण गेल्या चार पाच दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकणात अन मध्य महाराष्ट्रच्या घाटमाथा परिसरात पाऊस सुरु आहे, पण तेथे सुद्धा पावसाचा जोर कमी झाला आहे.

दरम्यान जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज दिला आहे. आता राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार याबाबत त्यांनी माहिती दिली आहे.

पंजाबराव डख काय म्हणतात?

आज अन उद्या विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मात्र हवामान कोरडे राहणार आहे. पण, 2 सप्टेंबर पासून अर्थात बैलपोळ्यापासून राज्यात पुन्हा पावसाला सुरवात होणार आहे.

2 सप्टेंबर पासून राज्यातील मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, जालना, बीड, परभणी, लातूर, बीड, हिंगोली, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, विदर्भातील बुलढाणा, वर्धा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

या भागात 2 ते 6 सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे. राज्यातील जवळपास 21 जिल्ह्यांमध्ये या काळात जोरदार पाऊस होईल अशी शक्यता आहे. तसेच मुंबई अन कोकणात सुद्धा या काळात चांगला पाऊस होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe