ऑगस्टच्या शेवटी अन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कस राहणार पाऊसमान ? कुठं बरसणार मुसळधार पाऊस ? पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 24 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. आज पासून पुढील चार दिवस महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. बहुतांशी भागात ओढे-नाले वाहतील असा पाऊस पडेल असे पंजाबरावांचे म्हणणे आहे.

Tejas B Shelar
Published:
Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पंजाब रावांनी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. पंजाब रावांनी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तसेच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार? या काळात पाऊसमान कसे राहणार? यासंदर्भात डिटेल माहिती दिली आहे.

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 24 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. आज पासून पुढील चार दिवस महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बहुतांशी भागात ओढे-नाले वाहतील असा पाऊस पडेल असे पंजाबरावांचे म्हणणे आहे. या काळात जोरदार पाऊस होणार असल्याने राज्यातील अनेक धरणांमध्ये पाण्याची आवक वाढणार असे पंजाब रावांचे म्हणणे आहे.

24 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान राज्यातील चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, सांगली, जत, पंढरपूर, पुणे, कोकण, अहमदनगर, नाशिक, मालेगाव, संगमनेर, शिर्डी, राहता, गंगापूर, वैजापूर, जळगाव जामोद, धुळे, नंदुरबार, साक्री, पारोळा, संभाजीनगर, जालना, जळगाव या भागात खूप मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तथापि, 27 तारखेनंतर महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळणार आहे. 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असा अंदाज आहे. या काळात महाराष्ट्रात सर्वदूर सूर्य दर्शनाची शक्यता आहे.

म्हणजेच या काळात राज्यात पाऊस विश्रांती घेणार आहे. पण 30 ऑगस्ट नंतर पुन्हा एकदा हवामानात बदल होईल आणि 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे. एकंदरीत ऑगस्ट प्रमाणेच सप्टेंबर महिन्याची सुरुवात ही जोरदार पावसाने होणार असा अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून समोर आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe