Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. ही बातमी आहे मोसमी पावसा संदर्भात. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मोसमी पावसासंदर्भात एक नवीन अंदाज दिला आहे. खरतर राज्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाचा जोर कमी झाला होता. पावसाचा जोर जवळपास आठ ते नऊ दिवस कमी होतां.
यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. पण आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे. पंजाबरावांनी आजपासून पावसाचा जोर वाढणार असे म्हटले आहे. उद्यापासून अर्थातच राखी पौर्णिमेपासून पावसाची तीव्रता आणखी वाढणार असे म्हटले जात आहे.
पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे राज्यातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, कडा, आष्टी, लातूर, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, अकोला, अमरावती, अकोट, अचलपूर, जालना, छत्रपती संभाजी नगर या भागात 18 ऑगस्ट पासून ते 25 ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या काळात पुणे आणि कोकणातही चांगला पाऊस पडणार आहे. लासलगाव, मालेगाव आणि चाळीसगाव परिसरात अजूनही अपेक्षित असा पाऊस पडलेला नाही. मात्र या कालावधीत या संबंधित भागातही चांगला जोराचा पाऊस पडणार असे पंजाबरावांचे म्हणणे आहे.
लासलगाव, मनमाड, मालेगाव, धुळे, जळगाव या भागात 20 ऑगस्ट पासून पावसाची तीव्रता सर्वात जास्त पाहायला मिळणार आहे. राज्यातील यवतमाळ ते लासलगाव पर्यंत पावसाची सक्रियता पाहायला मिळणार आहे.
पूर्व विदर्भातील सहा जिल्हे आणि पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये या काळात चांगल्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातही चांगला पाऊस पडणार असा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पंजाबरावांच्या नवीन अंदाजानुसार रक्षाबंधनापासून ते पोळ्यापर्यंत म्हणजेच दोन सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात चांगल्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी विशेष सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.