Panjabrao Dakh News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या मान्सूनची अगदी आतुरतेने वाट पाहिली जात होती तो मान्सून आता लवकरच आपल्या महाराष्ट्राच्या मुख्य भूमीत प्रवेश करणार आहे. यासंदर्भात जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील आज एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
पंजाबरावांनी मान्सून सध्या कुठे सक्रिय आहे, तो आपल्या महाराष्ट्रात कधीपर्यंत पोहोचेल, त्याआधी महाराष्ट्रात कोणत्या तारखांना पूर्व मोसमी पाऊस पडणार ? यासंदर्भात सविस्तर अशी माहिती दिली आहे.
काय म्हणताय पंजाबराव डख
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार काल अर्थातच 22 जूनला मान्सूनचे अंदमानात आगमन झाले आहे. दुसरीकडे राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वादळी पाऊस 25 मे पर्यंत सुरूच राहणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.
23 मे ते पंचवीस मे या कालावधीत राज्यातील सातारा, सांगली समवेत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे.
तसेच यंदा मान्सूनचे एक जूनच्या सुमारास केरळमध्ये आगमन होणार असे पंजाबरावांनी स्पष्ट केले आहे. पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याबरोबर महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाला सुरुवात होणार आहे.
केरळमध्ये एक जूनला मान्सून दाखल होईल आणि आपल्या महाराष्ट्रात एक जून ते 3 जून या कालावधीत मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावणार आहे. या कालावधीत महाराष्ट्रात मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच मान्सून आपल्या महाराष्ट्रात आठ जूनला सक्रिय होणार असल्याचा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे. त्यांनी सांगितले की यंदा मान्सूनचे महाराष्ट्रात लवकरच आगमन होणार होते मात्र बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सून आगमन थोडेसे लांबले आहे.
तथापि यंदा आठ जूनला महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार आहे. यामुळे ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी राहणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या मान्सूनची आतुरता लागली होती तो मानसून आता लवकरच महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे. यामुळे आता शेती कामांना वेग येणार आहे.