पंजाबराव डख : 11 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात सूर्यदर्शन तर काही भागात जोराचा पाऊस होणार ! पंजाबरावांचा सविस्तर हवामान अंदाज वाचा….

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे मोसमी पावसासंदर्भात. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाब रावांनी 11 ते 19 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील हवामान कसे राहणाऱ या संदर्भात एक नवीन अंदाज जाहीर केला आहे. खरे तर ऑगस्ट महिन्याची सुरुवात जोरदार पावसाने झाली.

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाने उसंत घेतली होती. पण ऑगस्टची सुरुवात जोरदार पावसाने झाली. ऑगस्टच्या सुरुवातीला राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोराचा पाऊस झाला आहे.

मध्य महाराष्ट्रात तर काही ठिकाणी पूरस्थिती तयार झाली. मात्र आता गेला दोन-तीन दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, आज नऊ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजात पंजाबरावांनी आज आणि उद्या महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

आज आणि उद्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. हे दोन दिवस राज्यात भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे पंजाबरावांनी स्पष्ट केले असून 11 ऑगस्ट पासून राज्यातील हवामानात मेजर चेंज पाहायला मिळणार आहे.

11 ते 19 ऑगस्ट दरम्यान म्हणजेच जवळपास नऊ दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान कोरडे राहणार असल्याचे डख यांनी म्हटले आहे. अर्थातच या कालावधीत राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे आणि सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे.

या नऊ दिवसांच्या काळात राज्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, बीड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर या भागात सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे. मात्र या कालावधीत कोकणात पाऊस सुरूच राहणार आहे.

याशिवाय नाशिक, धुळे, इगतपुरी, जळगाव, जामोद, बुलढाणा, अकोला, अमरावती, चांदूरबाजार, नागपूर या भागातही पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे भारतीय हवामान खात्याने उद्यापासून शनिवारपासून सोमवार पर्यंत राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात पावसाची विश्रांती राहणार असा अंदाज दिला आहे.

परंतु या काळात विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe