Rain Alert : महाराष्ट्रात सध्या शेतकरी कर्जमाफी सोबतच ओल्या दुष्काळाची भरपूर चर्चा सुरू आहे. राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे भरमसाठ नुकसान झाले आहे.
यामुळे आता महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी उपस्थित करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती तयार झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की खरीप हंगामातील कापूस सोयाबीन सारखी संपूर्ण नगदी पिके पाण्याखाली आहेत आणि शेतकऱ्यांचे भविष्य पुन्हा एकदा अंधारात.
यामुळे शेतकऱ्यांना होईल तेवढ्या लवकर मदत मिळावी अशी इच्छा साऱ्यांकडून व्यक्त होत आहे. शेतकरी संघटना यासाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करत आहेत.
स्वतः राज्याचे कृषिमंत्री मामा दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा पाऊस उघडल्याबरोबर शेतकऱ्यांना मदत जाहीर केली जाईल असे आश्वासन दिले आहे. यानुसार त्यांनी अकोल्यात आणि वाशिम मध्ये नुकतीच पाहणी केली आहे.
या पाहणी दौऱ्या वेळी मामा भरणे यांनी महायुती सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सकारात्मक आहे असे सांगितले. सरकार शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करणे हेतू प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच त्यांनी शेतकऱ्यांना हताश होऊ नये असे आवाहन देखील यावेळी केले. यामुळे आता फडणवीस सरकार कधीपर्यंत ओल्या दुष्काळाची घोषणा करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दरम्यान राज्यात अशी सगळी परिस्थिती असतानाच उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवात पुन्हा एकदा पावसाचा दांडिया पाहायला मिळणार आहे.
राज्यातील काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावणार असा अंदाज दिलाय. दरम्यान आता आपण राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार याची माहिती पाहूयात.
या जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी
अहिल्यानगर
रायगड
रत्नागिरी
नाशिक
पुणे
सोलापूर
छत्रपती संभाजीनगर
बीड
हिंगोली
परभणी
लातूर
धाराशिव
मुंबई
ठाणे
पालघर
सिंधुदुर्ग
धुळे
नंदुरबार
जळगाव
कोल्हापूर
सातारा
सांगली