पंजाबराव डख यांचा नवा अंदाज जाहीर ! ‘या’ तारखेनंतर पाऊस विश्रांती घेणार

Published on -

Rain Alert : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सातत्याने उपस्थित होत आहे. कृषिमंत्र्यांनी देखील ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे संकेत दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने प्रचंड हाहाकार माजवला आहे. यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झालय. शेतकऱ्यांना सुद्धा मोठा फटका बसलाय. अनेक भागात उभ्या पिकामध्ये पाणी साचले आहे. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे.

हेच कारण आहे की आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अंगणवाडी प्राथमिक माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर आज बीड सोलापूर धाराशिव जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात आला आहे.

अशातच आता शेतकऱ्यांसाठी पंजाब रावांनी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे.  पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे.

आज पासून दोन दिवस दिवसा ऊन पडेल व रात्रीच्या वेळी पावसाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात अशी परिस्थिती राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात पण दिवसा ऊन आणि रात्री पावसाचे वातावरण राहू शकते.

विदर्भात देखील भाग बदलत पाऊस पडेल, असे डख यांनी आपल्या नवीन अंदाजात सांगितले आहे. पण, त्यानंतर दोन दिवस राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.

25 व 26 सप्टेंबर रोजी राज्यात कुठेच पाऊस पडणार नसल्याचा अंदाज दिला जातोय. पण 27 सप्टेंबर नंतर राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस होणार आहे. हा पाऊस जवळपास 30 सप्टेंबर पर्यंत राहील.

त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना हार्वेस्टिंगसाठी काही दिवस कोरडे वातावरण मिळणार आहे. एक ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असून या काळात शेतकऱ्यांना सोयाबीन हार्वेस्टिंग करता येईल.

नक्कीच सोयाबीन हार्वेस्टिंग च्या वेळी राज्यातील हवामान कोरडे राहणार असल्याने याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. दरम्यान आता आपण आजपासून पुढील काही दिवस राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो याची माहिती पाहूयात.

कोणत्या भागात पडणार जोरदार पाऊस?

नांदेड

परभणी

लातूर

जालना

बीड

धाराशिव

अहिल्यानगर

सातारा

पुणे

संगमनेर

जळगाव

मुंबई

नाशिक 

नंदुरबार

विदर्भातील काही जिल्हे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News