Maharashtra News : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांत ऑरेंज व यलो अॅलर्ट दिला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी मुसळधार ते मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, राज्यात शनिवारी अनेक ठिकाणी हलका ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात व विदर्भातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडला. राज्याच्या अनेक जिल्ह्यांत दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. कोकण, घाटमाथा,
मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भातील ठिकठिकाणी पावसाचा जोर अधिक आहे. राज्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. मान्सूनला अनुकूल असलेला कमी दाबाचा पट्टा समुद्रसपाटीपासून २.१ किलोमीटर उंचीवर होता. त्यामुळे पूर्व विदर्भ,
कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत विदर्भातील अकोला येथे १०७, अमरावती १५, बुलढाणा २०, नागपूर २, वाशिम १५, वर्धा २० तर यवतमाळ येथे १७ मिमी पावसाची नोंद झाली.
कोकण भागातील मुंबई येथे ७ मिमी, सांताक्रुझ २८, रत्नागिरी २८, तर डहाणूमध्ये ८ मिमी पाऊस बरसला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे येथे ०.२ मिमी, लोहगाव ०.७, जळगाव २६, कोल्हापूर १९, महाबळेश्वर ४९, नाशिक ०.४, सांगली २, तर सातारा ०.२ मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील परभणी येथे ७ मिमी पाऊस पडला. घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस पडत आहे.
अॅलर्ट (२३ ते २६ जुलै)
ऑरेंज: मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
यलो: छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली
ऑरेंज / यलो : पुणे, सातारा, | कोल्हापूर, जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी