Pune Havaman Andaj : पुणे शहरासह परिसरात पावसाची विश्रांती ! असे असेल तापमान…

Ahmednagarlive24 office
Published:
Pune Havaman Andaj

Pune Havaman Andaj : पुणे शहर व परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. मंगळवारी (दि. ८) तुरळक हलक्या सरी वगळता वातावरण कोरडे होते. दरम्यान, पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहणार असून अति हलका ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शहरात पावसाला अनुकूल असलेला कमी दाबाचा पट्टा विरळ झाला आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. घाटमाथ्यावर ही पावसाचा जोर कमी झाला आहे. शहरात ऊन, ढगाळ हवामान व हलक्या सरी असे वातावरण पाहायला मिळत आहेत.

शहरात सायंकाळपर्यंत पुण्यात ०.२, लोहगाव ०, पाषाणमध्ये ०.३ मि.मी. पावसाची नोंद झाली. येत्या ९ ते १४ ऑगस्टदरम्यान पुणे शहर परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहणार असून,

अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. शहरात कमाल तापमानात चढउतार होत असून २९.२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२.९ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. कमाल व किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe