Summer heatwave : चालू हंगामाच्या उन्हाळ्यामध्ये उष्णतेने अक्षरशः हा कहर केला असून गेली अनेक दिवसापासून दररोज उष्णतेमध्ये मोठी वाढ होत असल्यामुळे नागरिकांची लाहीलाही होत असताना दिसून येत आहे. प्रत्येक वर्षी एप्रिल महिना सूरू झाला की तीव्रता झपाट्याने वाढत आहे हा अनुभव गेली अनेक पिढ्यापासून पुढे सूरू राहिला आहे.
गेली अनेक दिवसापासून नागरिक बाहेर पडणे टाळत असल्याने ग्रामीण भागात सतत दिसणारी नागरिकांची वर्दळ दिसेनासी झाली असून शेतात जाणारे शेतकरीही शेतात जाणे टाळत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्याच बरोबर रोडवर चालणारे दुचाकी व चारचाकी वाहनांचीही गर्दी कमी झाल्याचे दिसून येत आहे.

तसेच अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात असणाऱ्या विहीर व बोअरवर सौरऊर्जा बसवले असल्याने बसवलेल्या या सौरऊर्जेमुळे शेतकऱ्याना हक्काची वीज मिळू लागल्याने व वाढत्या उष्णतेमुळे बसवण्यात आलेले सर्वच सौरऊर्जा दिवसभर चालू ठेवल्याने जमिनीतील पाण्याचा स्रोत मोठ्या प्रमाणात खालावला गेला असून अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला असल्याचे दिसून येत आहे.
त्यातच प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये जी विजेची मागणी होत होती व त्यासाठी जे आंदोलने होत होती ती केवळ सौर उर्जेमुळे या वर्षी कधीच पुढे आली त्यामुळे वीजमहावितरण कंपनी वरील प्रत्येक वर्षी होणारा ताण फार कमी झाला आहे.
शेवगाव तालुक्यातील सुमारे १० ते १५ गावासाठी वरदान ठरणाऱ्या पैठण उजवा कालव्यात उन्हाळी आवर्तन सुटले की, शेकडोच्या वर पाणी उपसा परवान्याचे विद्युत पंप सुरु झाले की शेती पंपाच्या विजेवर सतत लोड येत रहायचा तो लोड आता सौर उर्जेमुळे थांबला असून
वीज महावितरणकडे प्रत्येक वर्षी होणारी विजेची मागणी चालू वर्षी तरी अजून पर्यंत झालेली दिसून आली नाही. मात्र सौरमुळे जमिनीतील पाण्याचा स्रोत टिकून न राहता सततच्या उपशामुळे तो अत्यन्त कमी झाला असल्याचे जानकार शेतकरी व नागरिकांतून बोलले जात आहे.