Weather News : अवकाळी पावसाचे सावट हटताच राज्यात थंडीचा कडाका वाढला. ढगाळ हवामान आता निरभर झाल्याने थंडी वाढली. मध्यंतरी थंडी गायब झाली की काय असे वाटत असतानाच आता व गारठू लागली आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान ११ ते १४ अंश सेल्सिअस पर्यंत गेले आहे. पुणे, नाशिक, अहमदनगर येथे पारा १२ अंशांवर आलाय. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ११ अंश तापमानाची नोंद झाली असून हे नीचांकी तापमान आहे.
थंडी वाढणार
आगामी तीन दिवस ही थंडी आणखी वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे व थंड आहे. अनेक भागात वातावरण थंड झाले आहे. त्यामुळे बोचरी थंडी अधिक वाढेल असे सांगितले जात आहे.
पावसाचाही अंदाज
काही भागात पावसाचाही अंदाज वर्तवला आहे. दक्षिणेतील जिल्ह्यांत पावसाला पोषक वातावरण असून अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांचा वेग कमी झाला तरी नैऋत्य बंगाल खाडीत विषुववृत्ताजवळ चक्राकार वारे वाहत आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती तापमान (शुक्रवार)
निफाड ११, नाशिक १२, जालना १४, अहमदनगर १२, नांदेड १४, संभाजीनगर १३, जळगाव १४, परभणी १३, अकोला १४, उदगीर १३, मालेगाव १५ महाबळेश्वर १३, सांगली १४, पुणे १४, बीड १४, सोलापूर १६