अहमदनगर :- भांडण झालेल्या तरुणास घरात लपवून ठेवल्याच्या संशयावरून पाच ते सहा जणांनी एका महिलेसह तिघांना तलवारीचा धाक दाखवत मारहाण केली.
केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर भागात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सुप्रिया महेश गाडे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे.

फिर्यादीच्या घरासमोर मोठ्याने आरडाओरड सुरू होती. ते पाहण्यासाठी गाडे घराबाहेर आल्या. बाळू ऊर्फ प्रवीण मनोहर शिंदे हे योगेश आदिनाथ पालवे याच्या घरात तलवार घेऊन आले.
दीपक अर्जुन शेलार, सूरज लक्ष्मण गवळी, सुरेश सुभाष झरेकर, संजय तरटे (सर्व रा. केडगाव) व इतर तीन ते चार अनोळखी तरुण सूरज अर्जुन लहाने याला शोधत आले.
सूरज मिळून आला नाही म्हणून आरोपी गाडे यांच्या घरात घुसले. सूरजला तुम्ही लपवले असे म्हणत त्यांनी तलवारीचा धाक दाखवत फिर्यादीसह घरातील तिघांना मारहाण केली.
- सातबारा नावावर असला तरी जमीन विक्रीचा पूर्ण अधिकार मिळत नाही ! कायद्यातील महत्त्वाच्या बाबी जाणून घ्या
- ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ शहरात उभारला जाणार ६ लेनचा नवा रिंगरोड !
- सावधान ! ‘या’ चुका केल्यास हिवाळ्यात गाडीचं इंजिन खराब होण्याचा धोका अधिक
- Fortuner ला टक्कर देणारी जबरदस्त SUV लाँच ! कसे आहेत नव्या गाडीचे फिचर्स ?
- पुणतांबा व परिसरातील पाणी प्रश्न सुटणार ! शिर्डी विमानतळासाठी 700 कोटींचा निधी, 5000 तरुणांना रोजगार : ना. राधाकृष्ण विखे पाटील













