सुजय विखे पाटलांसाठी स्मृती इराणी,मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडेंच्या सभा

अहमदनगर : महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ २१ एप्रिलला केंद्रीय वस्त्रोउद्योग मंत्री ना.स्मृती इराणी यांची जामखेड येथे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २० एप्रिल रोजी कर्जत येथे तर ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांची २० एप्रिल रोजी शेवगांव येथे जाहीर सभा होणार असल्याची माहिती भाजपाचे संयोजक प्रसाद ढोकरीकर यांनी दिली.

मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची नगर तालुक्यातील वाळकी येथे ऐतिहासिक सभा झाली. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची निवडणुक प्रमुख जबाबदारी असलेले राज्याचे जलसंधारण मंत्री ना.राम शिंदे हे राज्याचे स्टार प्रचारक असल्याने त्यांच्याही सोयीनुसार जिल्ह्यात सभा होत आहे.

राज्याच्या स्टार प्रचारकांच्या यादीसह देशातील प्रमुख नेत्यांच्या सभा नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात व्हाव्यात, यासाठी भाजपाचे लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री ना.स्मृती इराणी यांची सांगता सभेला उपस्थिती ही जमेची बाजू ठरणार आहे. ना.देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचे या मतदार संघावर विशेष लक्ष असून,

यापूर्वीही त्यांनी मतदार संघात सभा घेतल्या आहेत. आता पुन्हा २० एप्रिल रोजी एकाच दिवशी कर्जत येथे मुख्यमंत्री ना.फडणवीस व शेवगांव येथे ना.पंकजाताई मुंडे यांची सभा होणार आहेत.