राहुरी – एका शालेय तरूणीस मोटारसायकलवर पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना घडली असून याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात एका तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, राहुरी येथे शिक्षण घेत असलेली २० वर्षीय तरूणी घरी जात असताना गोट्या उर्फ राहुल पवार रा. चाकण, जि. पुणे ह. मु. धामोरी, ता. राहुरी हा वरवंडी फाटा ते वरवंडी या दरम्यान मोटारसायकलवरून येवून तरूणीस लज्जा उत्पन्न होईल असे भाष्य करून तू मला फार आवडते. माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून तरूणीस घरातून घेवून जाण्याची धमकी दिली.

सदरील प्रकार घडल्यानंतर दोन दिवसांनी त्याच तरूणाने रात्री १२.३० वाजेच्या सुमारास तरूणीच्या भावास फोनवरून शिवीगाळ करून तू पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर कोयत्याने तोडून टाकीन अशी धमकी दिली.
- एक कोटी रुपयांचे घर खरेदी करण्यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न किती असायला हवे ? वाचा सविस्तर
- ……. तर तुमचही पॅन कार्ड होणार कायमचे बंद, शासनाचा नवीन आदेश काय सांगतो?
- नोव्हेंबर महिन्यात बँका 13 दिवसांसाठी बंद राहणार ! रिझर्व बँक ऑफ इंडियाने जाहीर केली सुट्ट्यांची नवीन यादी
- नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच सोने खरेदीदारांना मिळाली गुड न्यूज ! आता 1 तोळा सोने खरेदीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे
- ‘या’ 5 कंपन्या शेअर होल्डर्सला देणार Dividend ! गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी













