संगमनेर :- काँग्रेसमध्ये सत्तेची अनेक महत्त्वाची पदे ज्यांनी सांभाळली, ज्यांनी अनेकदा स्वकियांनाच त्रास देत सहकाराच्या माध्यमातून सगळीकडे हुकूमशाही राबवली, त्यांची दादागिरी संपवण्याची हीच योग्य वेळ आहे.
आम्ही दक्षिणेत योग्य इंजेक्शन दिले, आता तुम्ही निर्णय द्या, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व नगरचे उमेदवार संग्राम जगताप यांनी सांगितले.

जोर्वे या आमदार राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या गुरुवारी झालेल्या प्रचाराच्या बैठकीत जगताप बोलत होते.

जगताप म्हणाले, गेली अनेक वर्षे काँग्रेसच्या माध्यमातून सातत्याने सत्तेत राहून ‘त्या’ परिवाराने अनेक पदे भोगली, पण पक्षाशी कधी निष्ठा दाखवली नाही. वेळ आली तशी पाठ फिरवली. दक्षिणेत त्यांना त्यांची जागा मतदारांनी दाखवली आहे.
आता उत्तरेतील जनतेला संधी आहे. या घराण्याची दादागिरी व हुकूमशाही कायमची संपवा. काँग्रेसने कायम सर्वांना घेत विकासाचे राजकारण केले आहे.

मात्र, याला हे घराणे अपवाद ठरले. जिल्ह्यातून यांना कायमचे हद्दपार करायचे आहे. आमदार भाऊसाहेब कांबळेंसारखा गरीब माणूस काँग्रेसने उमेदवार दिला. यांना साधी व प्रामाणिक माणसे चालत नाहीत.
विखे कुटुंबाची हाजीहाजी करणारेच लागतात. म्हणून आमदार कांबळे यांच्या विरोधात ते उभे ठाकले, असेही आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी सांगितले.
- 2026 मध्ये गुंतवणूकदारांसाठी ‘ही’ गुंतवणूक ठरणार तारणहार, सोन की शेअर मार्केट कुठून मिळणार जास्त रिटर्न ?
- गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी ! शेअर मार्केट 15 दिवस बंद राहणार, NSE ने जाहीर केली सुट्ट्यांची यादी
- लाडक्या बहिणींना पुन्हा मोठा दिलासा ! ई – केवायसी प्रक्रियाबाबत शासनाचा सर्वात मोठा निर्णय, आता….
- सरकार ‘या’ समाजातील लाडक्या बहिणींना देणार 50 हजार रुपयांचे कर्ज ! कशी आहे सरकारची नवीन योजना?
- दुष्काळात तेरावा महिना ! रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा झाली मोठी वाढ, नवीन रेट लगेच चेक करा













