शिर्डी :- राष्ट्रवादीकडून आम्ही निवडणूक लढवली असती तर ती राजकीय आत्महत्याच ठरली असती,’ अशा शब्दांत माजी विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षावर नाराजीचे कारण शनिवारी जाहीरपणे सांगितले.
‘नगरची जागा काँग्रेसला सुटल्यास पक्षाचा एक खासदार वाढेल म्हणून मी जिवाचे रान करीत हाेताे. त्याच वेळी पक्षाध्यक्ष राहुल गांधी मात्र सुजयने राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढण्याचा सल्ला देत होते.

दरम्यान विधानसभेच्या विराेधी पक्षनेतेपदाचा महिनाभरापूर्वीच राजीनामा पक्षाकडे दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
विखेंचा राजीनामा काँग्रेसने स्वीकारल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अापली भूमिका मांडली.
ते म्हणाले,आम्ही नगरची जागा सुजयसाठी मागत हाेताे. मात्र राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक ही काँग्रेससाठी सोडली नाही. याविराेधात काँग्रेसमधील काही नेतेही सहभागी झाले हाेते.
या विषयावर मी राहुल गांधींना भेटणार हाेताे, त्याच दिवशी शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन विखे पाटील कुटुंबाबाबत आपली खुन्नस जाहीररीत्या बोलून दाखवली.
आमच्या वडिलांबाबत अनावश्यक विधाने केली. त्यानंतर काँग्रेस पक्षाध्यक्षांनीही सुजयला राष्ट्रवादीत पाठवण्याचा मला सल्ला दिला.
परंतु, राष्ट्रवादीची आमच्याबाबतची पूर्वग्रहदूषित मानसिकता लक्षात घेता त्या पक्षाकडून सुजयने निवडणूक लढवणे ही राजकीय आत्महत्या ठरली असती,’ असे स्पष्टीकरण विखेंनी दिले.
- या बँका देतात 365 दिवसाच्या एफबीवर सर्वाधिक व्याज! FD करण्याआधी नक्की वाचा
- पुण्यातील ‘या’ प्राईम लोकेशनवर असणारे 90 लाखांचे घर आता फक्त 28 लाखात ! Mhada ने जाहीर केली नवीन लॉटरी
- महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांना पुन्हा मिळाली 3% महागाई भत्ता वाढ ! दिवाळीनंतर झाला मोठा निर्णय
- एक कोटी रुपयांचे घर खरेदी करण्यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न किती असायला हवे ? वाचा सविस्तर
- ……. तर तुमचही पॅन कार्ड होणार कायमचे बंद, शासनाचा नवीन आदेश काय सांगतो?













