अहमदनगर :- अधिकाऱ्यांना बूट फेकून मारण्यात काहीच शूरपणा नाही. त्याऐवजी आपणच पिढ्यानपिढ्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी व नगरसेवकांना बूट फेकून मारून विकासाचा जाब विचारण्याचे धाडस नागरिकांनी करावे,’ असा सल्ला जागरूक नागरिक मंचाने दिला.
महापालिकेत बोल्हेगाव रस्ता कामावरून झालेल्या आंदोलनात महापालिका अधिकाऱ्यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याच्या घटनेचा निषेध जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे व अन्य सदस्यांनी केला,तो करताना त्यांनी अधिकाऱ्यांवर नव्हे तर लोकप्रतिनिधी व नगरसेवकांना बूट फेकून मारण्याचा दिलेला सल्ला चर्चेचा झाला आहे.

‘नगरमधील अहिंसक व अतिसहनशील निष्क्रीय नागरिकांना यानिमित्ताने आवाहन केले जात आहे की, आपणच पैसे घेऊन निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी व नगरसेवकांना बूट फेकून असा जाब विचारला जावा. असे धाडस करण्याचे नगरकरांनी ठरवले तर शहरातील चपलांची दुकानेही पुरणार नाहीत.
वर्षानुवर्षे असणारे खड्डेयुक्त रस्ते, त्यावरून वाहणारे गटारीचे पाणी, सीनेवरच्या पुलाचे रखडलेले काम, चौका-चौकांतील बंद सिग्नल्स, शहरातील अरुंद रस्ते व त्यावरील अतिक्रमणे असे शहराचे प्रश्न न सोडवणाऱ्या लोकप्रतिनिधी व नगरसेवकांवर कोणी बूट फेकून मारला तर त्याचा जाहीर सत्कार जागरूक नागरिक मंच करील,’ असेही मुळेंनी यात स्पष्ट केले आहे.
- केंद्रीय कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिली गुड न्यूज ! ‘या’ तारखेला Pm Kisan चा 21 वा हफ्ता जमा होणार, नोव्हेंबरपर्यंत वाट पहावी लागणार
- पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुशखबर! ‘या’ धरणावर तयार होणार आठपदरी पूल, 82 गावांमधील नागरिकांना होणार फायदा
- ‘हे’ 5 शेअर्स गुंतवणूकदारांना देणार 31 टक्क्यांपर्यंत रिटर्न ! 12 महिन्यातच गुंतवणूकदार होणार श्रीमंत
- 2005 च्या हिंदू वारसा (दुरुस्ती) कायद्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्यास मुलीला मालमत्तेत वाटा मिळतो का ? सुप्रीम कोर्टाचे आदेश काय सांगतात?
- मध्य रेल्वेचे महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठे गिफ्ट ! ‘या’ जिल्ह्यातुन चालवची जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन