अहमदनगर : आपण युवकाने युवती वर ॲसिड हल्ला केल्याचे बऱ्याच वेळा ऐकले असेल. पण नगर मध्ये मात्र युवतीने युवकावर ॲसिड फेकण्याची घटना घडली.
नगर-मनमाड रोडवरील प्रेमदान चौकातील एका हॉटेलमध्ये युवकावर ॲसिड हल्ल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

बुरखाधारी व्यक्तीने हा हल्ला केल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या हल्ल्यामध्ये युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करून एका खाजगी रुग्णालयात त्याला दाखल केले आहे .
तोफखाना पोलिसांनी या प्रकाराची त्वरित दखल घेत घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली आहे.मिळालेल्या माहितीवरून एका युवतीला ताब्यात घेतले आहे . हि घटना प्रेमप्रकरणातून घडली आहे
आष्टी तालुक्यातील अमीर या मुलाचे नगरमध्ये शिकत असलेल्या नारायण डोह येथील २१ वर्षाच्या युवतींबरोबर प्रेमसंबंध होते .
लग्न करण्याच्या कारणावरून त्याच्यात रोज वाद होत होते ,या कारणावरून त्याच्यात सोमवारी वाद झाले सदर युवतीने त्याला तोरणा हॉटेल येथे बोलावले ,मुलगा काही आपले ऐकत नाही म्हणून सदर युवतीने त्याच्या तोंडावर ॲसिड फेकले यात तो जखमी झाला .
तोफखाना पोलीस ठाण्याचे सपोनि प्रकाश पाटील व कर्मचाऱ्यांनी सदर युवतीचे लोकेशन मिळवून सदर युवतीला ४ वाजता चौकशीसाठी ताब्यात घेतले .
सदर घटनास्थळी युवतीच्या चप्पल व इतर वस्तू आढळून आल्याने पोलिसांचा तिच्यावर व तिच्या इतर जोडादाराबाबत संशय वाढला असून पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहे . पोलिसांनी सदर युवकाचा जबाब नोंदविला आहे .
सदर युवतीचे वडील नगरमधील एका टेलरींग दुकानात काम करत असून मुलगी एमएस्सी करत असल्याचे सांगितले सदर युवती पोलिसानं उडवाउडवीची उत्तरे देत असून पोलीस चक्रावून गेले आहेत .
- Apollo Tyres Share Price: अपोलो टायर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? सध्याची ट्रेडिंग पोझिशन काय? रेटिंग अपडेट
- ONGC Share Price: तज्ञ म्हणतात ONGC चा शेअर खरेदी करा! मात्र 1 वर्षात झाली 20.28% घसरण…बघा आजची किंमत
- CDSL Share Price: मल्टीबॅगर स्टॉकमध्ये आज मोठ्या कमाईची संधी! नोट करा तज्ञांची टार्गेट प्राईस
- Vedanta Share Price: वेदांता शेअर आज बुलीश…मोठ्या प्रमाणावर खरेदी! तज्ञ म्हणतात की…
- IFCI Share Price: IFCI शेअर्समध्ये मागच्या आठवड्यापासून तेजी! दिला 5.82% रिटर्न… आज मात्र?