अहमदनगर :- प्रेमदान चौकातील एका हॉटेलमध्ये प्रेमप्रकरणातून युवकावर ॲसिड हल्ल्याची घटना सोमवारी सकाळी घडली होती.ह्या घटनेचा उलगडा आज झाला आहे
प्रेमदान चौकातील ॲसिड हल्ला प्रकरणात संशयित म्हणून पकडलेल्या युवतीने हल्ला केल्याची कबुली दिली आहे.

दरम्यान आज सायंकाळी पोलिसांनी तिला अटक केली असून क्राइम पेट्रोल ही टीव्ही सीरिअल पाहून हे कृत्य केल्याचे तिने कबूल केले.
अमीर याचे दुसऱ्या मुलीबरोबर प्रेम प्रकरण सुरू होते याचा बदला घेण्यासाठी सदर युवतीने प्लॅन करून असिड फेकले व पलायन केले असल्याचे समोर आले आहे सदर ॲसिड कुठून आणले याचा पोलिस शोध घेत आहे.
आष्टी तालुक्यातील अमीर या मुलाचे नगरमध्ये शिकत असलेल्या नारायण डोह येथील २१ वर्षाच्या युवतींबरोबर प्रेमसंबंध होते.
लग्न करण्याच्या कारणावरून त्याच्यात रोज वाद होत होते ,या कारणावरून त्याच्यात सोमवारी वाद झाले सदर युवतीने त्याला तोरणा हॉटेल येथे बोलावले ,मुलगा काही आपले ऐकत नाही म्हणून सदर युवतीने त्याच्या तोंडावर ॲसिड फेकले यात तो जखमी झाला होता.
सदर घटनास्थळी युवतीच्या चप्पल व इतर वस्तू आढळून आल्याने पोलिसांचा तिच्यावर व तिच्या इतर जोडादाराबाबत संशय वाढला होता.त्यानंतर तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
दरम्यान सदर युवतीचे वडील नगरमधील एका टेलरींग दुकानात काम करत असून मुलगी एमएस्सी करत असून या हल्ल्यामध्ये युवक गंभीर जखमी झाला असून एका खाजगी रुग्णालयात त्याला दाखल केले आहे.
- भारतातील सर्वात उंच स्थानक 2027 मध्ये सेवेत ! ‘या’ शहरात विकसित करणार 16 मजली उंच रेल्वे स्टेशन ! लंडन, पॅरिसला देणार टक्कर
- महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी !
- सरकारचा निर्णय शेतकऱ्यांसाठी बनलाय डोकेदुखी ! शेतजमीन खरेदी-विक्रीचा नियम पूर्णपणे बदलला, ‘या’ कागदाविना आता जमीन विक्री होणे अशक्य
- नोकरीसाठी आता बेंगलोरला जाण्याची गरजच नाही….! पुण्यानंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ शहरात उभारले जाणार आयटी पार्क
- पुणे मेट्रो संदर्भात महत्त्वाची अपडेट…. स्वारगेट – कात्रज मेट्रो मार्ग प्रकल्पासाठी आणखी काही वर्ष वाट पाहावी लागणार?













