श्रीगोंदा :- काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने उमेदवारी दिल्यास विधानसभेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवू. शरद पवार जेव्हा सांगतील, त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू, असे जि. प. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व काँग्रेसच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस अनुराधा नागवडे यांनी बुधवारी सांगितले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नागवडे म्हणाल्या, पिण्याच्या पाण्यासाठी कुकडीचे आवर्तन सुटले आहे. मात्र, त्यातून संपूर्ण स्त्रोत भरले गेले नसल्याने मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण भासत आहे.

बेलवंडी येथील गावठाण तलाव, पाणीपुरवठा बंधारा, लोणी व्यंकनाथ येथील भाबाचा तलाव, जांभळीचा तलाव, शिरसगाव रस्ता खंडाळे बंधारा, खामकरवाडी साठवण बंधारा, काळेवाडी पाझर तलाव, गावठाण पाझर तलाव, पठारवाडी पाझर तलाव, कनेरकर मळा, बंधारे वस्ती बंधारा, पिसोरे बुद्रूक येथील पाझर तलाव, शिरसगाव बोडखा येथील गुणवरे वस्ती बंधारा,
तसेच १३२ केंद्रांतर्गत लोणी व्यंकनाथ गावठाण पाणीपुरवठा बंधारा, मडकेवाडी साठवण तलाव, कोळपे वस्ती साठवण तलाव, शिरसगाव बोडखा पाझर तलाव, वडगाव येथील दावल मलिक साठवण तलावाला पाणी मिळावे, यासाठी तहसीलदार महेंद्र माळी यांना निवेदन दिले आहे.
११ ते १४ मेदरम्यान मांडवगण, कोळगाव, आढळगाव, येळपणे या गटांत दुष्काळी दौरा आहे. राजेंद्र नागवडे यांच्या १४ रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी काही उपाययोजना जाहीर करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.
- खाते रिकामे असतानाही UPI पेमेंट शक्य! UPI च्या नव्या फीचरमुळे युजर्सना काय होणार फायदा?
- शासनाचा दणका! ६८ हजार रेशन कार्डधारकांचा लाभ बंद, तुमचं नाव यादीत आहे का?
- नवीन आधार अॅप 28 जानेवारीला लॉन्च; मोबाईल नंबर, पत्ता अपडेट घरबसल्या शक्य
- आयुष्मान भारत योजनेत वर्षभरात किती वेळा घेता येतात उपचार? जाणून घ्या सविस्तर नियम
- FASTag वापरकर्त्यांसाठी मोठा दिलासा ! १ फेब्रुवारी २०२६ पासून कार FASTag वर KYV पडताळणी रद्द













