जमीन विकण्यास विरोध केल्याने पत्नीवर केले चाकूने वार !

अहमदनगर : जमीन विकण्यास हरकत घेणाऱ्या पत्नीस शिवीगाळ करून तिच्या हातावर चाकुने वार करून तिला जखमी केले.

ही घटना विळद घाट येथील इंजिनिअरींग कॉलेजवळ शनिवारी घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की, सुवर्णा सुभाष सानप (रा.विळदघाट, इंजिनिअरींग कॉलेजवळ) या घरी असताना त्यांचा पती सुभाष बाजीराव सानप हा त्यांना म्हणाला की, मी माझी जमीन विकणार आहे.

तू मध्ये पडू नकोस, नाहीतर तुला मारुन टाकीन असे म्हणून शिवीगाळ केली. आणि हातातील चाकुने पत्नी सुवर्णा हिच्या मनगटावर चाकुने वार करुन मी माझ्या जीवाचे बरेवाईट करेन व तुझ्या आईवडीलांचे नाव घेईल अशी धमकी दिली. यामध्ये सुवर्णा ही जखमी झाली.