अहमदनगर :- जातीयवादी शक्ती व मनुवादी विचारांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विधानसभा निवडणुकीत मनसे, वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेतले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी रविवारी जामखेड दौऱ्यात व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी पवार आले होते. विविध गावांमध्ये जाऊन भेटी घेतल्यानंतर जामखेड येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली.


पवार म्हणाले, देशात चुकीचे जातीय विधाने करूनही प्रज्ञा साध्वीसारखे अनेक जण निवडून आले याचे एकमेव कारण म्हणजे मोदी लाट. ही लाट मागील निवडणुकीसारखी सुप्त राहिली.
आयोगच भाजपकडे झुकलेला दिसला. मावळ लोकसभा मतदारसंघात अनेक कामे करूनही आमचा पराभव झाला. तथापि, यातून खचून न जाता पुन्हा जोमाने काम करू. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वेगळे निकाल लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात डॉ. सुजय विखे यांनी तीन वर्षांपासून काम सुरू केले होते. त्यांच्या ताकद मोठी होती. आमचा उमेदवाराला वेळ कमी मिळाला आणि ताकदही कमी पडली.

भाजपच्या उमेदवाराला पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघात सर्वात कमी मताधिक्य मिळाले. त्यामुळे शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
या दोन्ही तालुक्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोमाने एक दिलाने काम केले. या मतदारसंघात विकासाचे काम झाले नाही.

आज दुष्काळी परिस्थिती आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी नाही, याकडे मंत्र्यांनी लक्ष दिले नाही. मतदारसंघातील अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. ही खदखदत लोकांच्या मनात आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण कर्जत-जामखेडमधून निवडणूक लढवणार का, या प्रश्नावर मतदारसंघातील कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्यावर हे अवलंबून आहे, असे म्हणत पवार यांना या मुद्द्याला बगल दिली. पक्षाचे नेते जो आदेश देतील तो आपण पाळू,असेही त्यांनी सांगितले.
- चेकवर सही करण्यासाठी ‘या’ रंगाचा पेन वापरला तर तुमचा चेक वठणार नाही !
- मोठी बातमी ! 2025 अखेर महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार Vande Bharat Express ! 550 किमीचा प्रवास आता फक्त 7 तासात
- कमीत कमी किती EMI वर खरेदी करता येणार ह्युंदाई क्रेटा ?
- ‘हे’ आहेत भारतातील टॉप 3 प्रॉफिटेबल बिजनेस ! एकदा सुरु झालेत की लाखोंची कमाई होणार
- बातमी कामाची ! महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर, सलग इतके दिवस बँका बंद राहणार