पारनेर :- तालुक्यातील पाडळी तर्फे कान्हुर येथील तन्मय धोंडीभाऊ सुंबे वय 9 वर्षे, या बालकाचा पाण्याच्या टाकीमध्ये पडुन दुर्दैवी मृत्यू झाला.
या बाबत सविस्तर माहिती अशी की तन्मय सुंबे हा अत्यंत हुशार व गुणी विद्यार्थी होता. गोरेगाव येथील मंथन पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता तिसरीचे शिक्षण घेऊन तो चौथी इयत्ता मध्ये गेला होता.

उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या टाकी मध्ये पोहण्यासाठी गेला होता. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
काही वेळानंतर तन्मय हा घरात नसल्यामुळे आई व आजी यांनी त्याचा शोधा शोध करण्यास सुरूवात केली.
काही वेळातच पाण्याच्या टाकी मध्ये मृत्य अवस्थेत त्याचा मृतदेह पहावयास मिळाला. यानंतर सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
- Tata च्या सर्वाधिक सुरक्षित टॉप 5 गाड्या कोणत्या ? Punch, Nexon सह कोणाचा नंबर लागतोय?
- कमी बजेटमध्ये मिळणार जबरदस्त फिचर्स ; 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतात ‘हे’ स्मार्टफोन
- दिवाळीत कमाईची संधी ! ‘हे’ ३ शेअर्स पोर्टफोलिओमध्ये असतील तर पैसाच पैसा
- 365 दिवसात लखपती बनवणार शेअर ! 1 लाखाचे झालेत 43 लाख
- Work From Home : महिलांसाठी संधी, 25 हजाराची मशीन अन महिन्याला होणार 30 हजाराची कमाई