जामखेड :- नान्नज येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या घरातून सहा लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
अमजद निजाम पठाण याच्या घरात गोवा – १००० गुटख्याचा साठा जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषणने जप्त केला. या गुटख्याची किंमत सहा लाख दहा हजार रुपये आहे.

कारवाईची चाहूल लागल्याने आरोपी अमजद पठाण फरार झाला. पठाण हा राष्ट्रवादी मुस्लिम सेवा संघाचा प्रवक्ता आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक औताडे यांना खबऱ्याकडून नान्नज येथील अमजद पठाण याच्या घरात चोरीचा माल असल्याची माहिती मिळाली होती.
त्या आधारे गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तेथे छापा टाकून झडती घेतली असता घरात लपवून ठेवलेला गुटख्याचा साठा सापडला. जप्त केलेला गुटखा जामखेड पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
- पोस्ट ऑफिसची गृहिणींसाठी खास बचत योजना ! एकदा पैसा गुंतवला की दर महिन्याला मिळणार ‘इतकं’ व्याज
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! कुटुंब पेन्शनच्या नियमांमध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा बदल, आता….
- वादळी पावसाचा मुक्काम वाढला! आता ‘या’ तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार, हवामान खात्याचा नवा अंदाज चिंता वाढवणारा
- मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय ! आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध अधिकार असतो का ? न्यायालय सांगते….
- काय सांगता ! ‘हा’ आहे भारतातील सर्वात मोठा जिल्हा, दिल्लीपेक्षा 31पट अधिक क्षेत्रफळ













