अहमदनगर :- क्षुल्लक कारणावरून नव्हे जातीयवादातून प्रेम जगताप ची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप भाजपाचे खा. अमर साबळे यांनी केला.
शहरात रेल्वे स्टेशन परिसरात राहणाऱ्या प्रेम उर्फ किरण जगताप या तरुणाचा काही समाजकंटकांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता.

या प्रकरणाची कसून चौकशी करावी आणि दोषी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी खा. साबळे यांनी केली आहे. दरम्यान याप्रकरणात दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी त्यांनी केली.
साबळे यांनी रविवारी मृत प्रेम जगताप यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी भाजपचे शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

प्रेम जगताप याला २९ एप्रिलला शहरातील पुणे बसस्थानकात मारहाण झाली होती. डोक्याला मार लागल्याने उपचारा दरम्यान त्याचा ४ जूनला मृत्यू झाला.
दरम्यान गुन्हा दाखल असतानाही महिनाभरात कोतवाली पोलिसांकडून एकाही आरोपीला अटक झालेली नव्हती. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले होते.
किरणची हत्या जातीयवादातून झालेली आहे. गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी पाहिजे तशी कारवाई केली नाही.
त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून या प्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन करणार असल्याचे खा.साबळे यांनी आज सांगितले.
- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पावसामुळे खरीप कांद्याच्या क्षेत्रात मोठी वाढ; बाजारात आवक वाढल्याने दर घसरले,
- तुमचे पॅन कार्ड बंद तर नाही ना? एका क्लिकमध्ये तपासा पॅनची स्थिती; अन्यथा बसू शकतो मोठा दंड
- केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! RBI, NABARD आणि सार्वजनिक विमा कंपन्यांच्या कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी मोठी वेतनवाढ मंजूर
- प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पुणे रेल्वे विभागात दुहेरीकरण कामामुळे २६ एक्स्प्रेस व १२ डेमू गाड्या रद्द; प्रवाशांना मोठी गैरसोय
- सिम कार्डचा एक कोपरा कापलेला का असतो? लाखो लोकांना माहीत नसलेले सिक्रेट उघडले!













