अहमदनगर :- हक्काचा आमदार नसल्याने आजवर नगर तालुक्यातील अनेक कामे रखडली. पण मी ती उणीव आता जाणवू देणार नाही.
लोक गाव दत्तक घेतात. पण मी आता नगर तालुकाच दत्तक घेत आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार सुजय विखे यांना नगर तालुक्याच्या टंचाई आढावा बैठकीत केले.
नगर तालुका टंचाई आढावा बैठक नक्षत्र लॉन या ठिकाणी झाली. यावेळी खासदार विखे बोलत होते.
तालुक्यातील ग्रामस्थांनी टँकर, चारा छावण्या यांचे प्रश्न मांडले आणि प्रशासनाला धारेवर धरले. जनतेच्या प्रश्नांना तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी उत्तरे दिली.
प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचना यावेळी खासदार विखे यांनी केल्या. खरीप अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करताना बँक खाते क्रमांकाची अडचण येत आहे.
त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना सांगून आठ दिवसांची मुदत त्यासाठी मागून घेणार असल्याचे विखे यांना सांगितले.
छावण्यांसाठी झालेला दंड रद्द करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी करू, असेही त्यांनी सांगितले. छावण्यांच्या देयकांवर अनेक अधिकाऱ्यांच्या सह्या लागतात,
त्या घेण्यासाठी छावणी चालकांचे अनेक दिवस जातात. त्यासाठी एकाच ठिकाणी सर्व सह्या मिळू शकतील, अशी व्यवस्था करण्यासंदर्भात त्यांनी तहसीलदारांना सूचना केल्या.
जिरायत भागातील प्रश्नांसदर्भात आणि साखळाई पाणी योजने संदर्भात मी जी आश्वासने दिली, ती पाच वर्षांत नक्कीच पूर्ण केले जातील.
आश्वासने पूर्ण करूनच तुम्हाला मते मागायला येईल. बुऱ्हाणनगर पाणी योजना बीओटी तत्वावर चालवण्यास देण्याचा जिल्हा परिषदेचा विचार आहे.
आमची जनसेवा फाउंडेशन, तर योजना चालवण्यास तयार आहे. यापुढे जिल्ह्यातील सर्व पाणी योजनांना सौर ऊर्जेवर घेण्याचा मानस आहे, असे विखे म्हणाले.
- कामाची बातमी : राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘या’ कामासाठी मिळतो डेली 8,700 रुपयांचा भत्ता !
- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दोन नव्या महामार्गांची कामे सुरू होणार, ‘या’ कंपनीला मिळाला कॉन्ट्रॅक्ट
- DMart च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! मकर संक्रांति निमित्ताने डीमार्टमध्ये ‘या’ वस्तूंवर मिळतोय 80% डिस्काउंट, वाचा सविस्तर
- 8 जानेवारीपासून हवामानात मोठा बदल, काही भागात कडाक्याची थंडी अन् काही भागात धो धो पाऊस; वाचा हवामान खात्याचा अंदाज
- HDFC Life, डाबर इंडियासह ‘हे’ 3 शेअर्स गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त रिटर्न! टॉप ब्रोकरेज हाऊसकडून मिळाली बाय रेटिंग













