पारनेर : पारनेर तालुक्यातील पोखरी (पवळदरा) येथे ३२ वर्षांच्या तरुणाने स्वत:च्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून रामदास शेटीबा भोसले (वय ३२ वर्षे), रा. पोखरी (पवळदरा) या विवाहित तरुणाने घरातील खिडकीच्या लोखंडी अंगलच्या गजास सुताच्या दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
ही घटना सोमवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. घटनेच्या अगोदर रामदासची पत्नी अनिता, स्वत:ची दोन मुले व दिराची दोन मुले, असे पाचजण सरपण आणण्यासाठी रानात गेले होते.
अनिता व मुले सरपण घेऊन घरी आल्यानंतर पतीने गळफास घेतल्याचे पहिले व तिने दिराला फोन करून माहिती दिली. याबाबतची माहिती भानुदास शेटीबा भोसले यांनी टाकळीढोकेश्वर दूरक्षेत्रात दिली.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. तेथे उत्तरीय तपासणी करून मृतदेह मंगळवारी सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
- मुंबईतील एका बड्या कंपनीची शेअर होल्डर्ससाठी मोठी घोषणा ! दिग्गज रिअल इस्टेट कंपनी देणार मोफत शेअर्स
- .……तर भारतीय कर्मचाऱ्यांना मिळणार सहा महिन्यांची फुलपगारी सुट्टी ! कारण काय ?
- नाशिक ते बोरीवली प्रवास होणार सुसाट….! समृद्धी महामार्गावरून धावणार नवीन बस
- पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढणार! शेतकऱ्यांना किती हजाराचा फायदा होणार?
- एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार २४ हजार रुपयांचे व्याज ! पंजाब नॅशनल बँकेची योजना ठरणार गेमचेंजर













