नेवासा :- तालुक्यातील जेऊर हैबती शिवारात एकाला तलवारीने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
जेऊर हैबती शिवारात पंडित यांच्या ओमसाई मोबाईल शॉपी येथे अंबादास कारभारी गायकवाड, वय ३३, धंदा शेती, रा, जेऊर हैबती हे बसलेले असताना तेथे चार आरोपी आले,

व काही एक कारण नसताना शिवीगाळ करुन तलवारीने वार केले व जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
आरोपींनी याला जिवंत सोडू नका, तोडून टाका, असे म्हणत खून करण्याचा प्रयत्न केला,
जखमी अंबादास कारभारी गायकवाड यांनी वरील प्रमाणे नेवासा पोलिसात फिर्याद दिल्यावरुन मारहाण करणारे आरोपी अक्षय दिलीप उगले, शाहराव भाऊराव उगले, सुनील भाऊराव उगले,
सर्व रा. जेऊर हैबती यांच्याविरुद्ध भादवि कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ आर्म अक्ट ४ / २५ प्रमाणे गुरनंण ४०२ दाखल करण्यात आला आहे.
- देशातील ‘या’ बँका देणार सर्वात स्वस्त Home Loan ! 50 लाखांच्या कर्जासाठी कितीचा हप्ता ?
- पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 12 हजार 500 रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना मिळणार 40 लाखांचे रिटर्न!
- महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 26 ऑक्टोबरपर्यंत दिवाळी सुट्टी जाहीर ?
- चेकवर सही करण्यासाठी ‘या’ रंगाचा पेन वापरला तर तुमचा चेक वठणार नाही !
- मोठी बातमी ! 2025 अखेर महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार Vande Bharat Express ! 550 किमीचा प्रवास आता फक्त 7 तासात