श्रीगोंदा :- बारावीच्या विद्यार्थ्याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दि ८ एप्रिल रोजी तालुक्यातील बांगर्डा येथील १ विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी पाठपुरावा केला होता.
तब्बल दोन महिन्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अजित संजय गायकवाड (वय १९) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
याप्रकरणी मुलाचे वडील संजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून बांगर्डा गावातील अंकुश बास्कू गायकवाड, आदिका अंकुश गायकवाड, अमोल तेजमल कदम, राजू तात्याबा शेळके,
सोमनाथ अंबादास गायकवाड, किरण संभाजी गायकवाड, तुषार संभाजी गायकवाड यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अजित हा घोगरगाव छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे बारावीला विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. यातील एका आरोपीच्या मुलीशी अजित याचे प्रेमप्रकरण होते.
त्या कारणातून मुलीचे वडील-आई व इतर नातेवाइकांनी अजित गायकवाड याला दमदाटी केली. १८ एप्रिल रोजी अजित गावात जातो असे सांगून गेला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो परत न आल्याने वडील व इतर नातेवाइकांनी त्याचा शोध घेतल्यानंतर शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन
आत्महत्या केलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला होता. प्रेमप्रकरणातून मुलाला त्रास देऊन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
- PM किसान योजना : २२व्या हप्त्याची फेब्रुवारीत शक्यता, पण ‘या’ अटी पूर्ण नसतील तर पैसे अडकणार
- एवढं मोठं विमान हवेत उडतं कसं? जाणून घ्या उड्डाणामागचं विज्ञान
- फेब्रुवारी २०२६ मध्ये दुर्मीळ चतुर्ग्रही राजयोग; तीन राशींसाठी करिअर-व्यवसायात सुवर्णसंधी
- राज्यातील शेतजमिनींच्या वादांना पूर्णविराम; पोटहिस्सा मोजणी पथदर्शी प्रकल्पाला शासनाची मंजुरी
- आयकर विभागात ९७ पदांची मोठी भरती; १० वी, १२ वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी, अर्जाची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२६













