अकोले :- विजेचा धक्का बसल्याने मायलेकाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना गर्दनी शिवारात काल सायंकाळी घडली.
संगीता दिलीप झोळेकर (वय-40) व आविष्कार दिलीप झोळेकर (वय-16) दोघे मूळ रा. गर्दनी, हल्ली- अमृतनगर, नवीन नवलेवाडी, अकोले असे यातील मृत्यू झालेल्या मायलेकाची नावे आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे अकोले शहरासह गर्दनी गावावर शोककळा पसरली आहे.
अकोले येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असणारे दिलीप झोळेकर यांची गर्दनी शिवारात वडिलोपार्जित शेतजमीन आहे.
त्यांच्या पत्नी संगीता व मुलगा अविष्कार हे काल शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. त्यासाठी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास मोटार सुरू करण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडल्याचे समजते.
मुलगा व पत्नी फोन उचलत नाही म्हणून दिलीप झोळेकर यांनी आपल्या नातेवाईकांस फोन करून त्यांना शेतात जावयास सांगितले असता गर्दनी शिवारातील कतार पाइन येथे शेतात सायंकाळी 6.30 च्या सुमारास त्यांचे दोघांचेही मृतदेह आढळले.
- महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये दिवाळी बोनस, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट
- ‘या’ कंपनीच्या एका शेअरवर मिळणार एक शेअर फ्री ! गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
- Tata समूहाचा ‘हा’ शेअर 90 टक्क्यांनी घसरला, घसरणीनंतरही गुंतवणूकदारांचे नुकसान झाले नाही, कारण….
- दिवाळीआधी कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज ! EPFO च्या सदस्यांना आता PF मधून शंभर टक्के रक्कम काढता येणार, पण….
- HCL Technologies गुंतवणूकदारांना देणार लाभांश ! रेकॉर्ड डेट झाली फायनल, वाचा सविस्तर