संगमनेर – संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथे राहणा-या ३४ वर्ष वयाच्या महिलेने माझ्या सासूला शिवीगाळ का केली? असा जाब विचारल्याने दोघा आरोपींनी तुम्ही सामाईक रस्ता वापरायचा नाही, असे म्हणत महिलेची गचांडी धरुन धक्का बक्की करुन अंगावरील कपडे फाडून लजा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन विनयभंग केला.
शिवीगाळ करत जिवे ठार मारुन टाकू, अशी धमकी दिली. पिडीत महिलेने वरीलप्रमाणे घारगाव पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी भागवत भाऊसाहेब डोमाळे, भाऊसाहेब भागा डोमाळे, दोघे रा. विरेवाडी, ता. संगमनेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींमध्ये कोंबड्या व रस्त्याच्या कारणातून वाद आहेत हेकाधं टकले हे पुढील तपास करीत आहेत.
- कमीत कमी किती EMI वर खरेदी करता येणार ह्युंदाई क्रेटा ?
- ‘हे’ आहेत भारतातील टॉप 3 प्रॉफिटेबल बिजनेस ! एकदा सुरु झालेत की लाखोंची कमाई होणार
- बातमी कामाची ! महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर, सलग इतके दिवस बँका बंद राहणार
- तुमच्या पत्नीच्या नावाने पोस्टाच्या योजनेत दरमहा 8,000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळणार 5 लाख 70 हजार 927 रुपये
- वाईट काळ संपला ! 20 ऑक्टोबर पासून ‘या’ राशीच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरू होणार