अहमदनगर – दै. ‘पुढारी’च्या अहमदनगर आवृत्तीचे उपसंपादक तथा क्राईम रिपोर्टर गणेश मारुती शेंडगे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एलएल.एम. परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी वाणिज्य कायद्यात विधी शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात त्यांनी ‘मोटार वाहन कायद्यातील नुकसान भरपाई संबंधी’च्या विषयात प्रबंध सादर केला होता. त्यांनी यापूर्वी बी.एस.एल. एलएल.बी., बी.जे. या पदव्या प्राप्त केल्या आहेत. त्यांना प्राचार्य एम. एम. तांबे, प्रा. डॉ. अतुल मोरे, प्रा. गिरीश हिरडे, प्रा. डॉ. बाळासाहेब पांढरे, प्रा. विजय शिंदे, प्रा. रामेश्वर दुसुंगे, प्रा. संपत पाचे, प्रा. प्रियंका खुळे-कांडेकर, प्रा. पूनम वड्डेपल्ली आदींचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावचे रहिवासी असलेले गणेश शेंडगे हे गेल्या ११ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. गुन्हेगारी, कायदा क्षेत्रात त्यांचा विशेष अभ्यास आहे. त्या विषयांवर त्यांचे लिखाण राज्यभरात गाजले आहे.
खर्डा हत्याकांडाच्या निकाल लागल्यानंतर मयत व्यक्तीवर झालेल्या अन्यायाबाबत त्यांनी लिहिलेल्या वृत्तमालिकेची राज्य शासनाने विशेष दखल घेऊन या खटल्याची पुन्हा सुनावणी घेण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केली आहे.
चिमुरडीवरील अत्याचार प्रकरण, पांगरमल विषारी दारुकांड, जवखेडे हत्याकांड, कोपर्डी हत्याकांड, हनी टॅ्रप आदी विषयांवरील त्यांच्या वृत्तमालिका वेळोवेळी गाजल्या. त्यांचे पंचनामा, क्राईम स्पॉट, डायल १०० हे स्तंभ पोलिस वर्तुळात चांगलेच चर्चेचे ठरले. गेल्या सव्वपाच वर्षांपासून ते ‘पुढारी’त कार्यरत आहेत.
- School Holiday : अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टी ! शाळा सुरू की बंद ? वाचा महत्वाची अपडेट
- Suzlon Energy Share Price: 5 वर्षात गुंतवणूकदार झाले मालामाल…दिला 1617% रिटर्न! आज खरेदी करावा का? टार्गेट प्राईस अपडेट
- IRFC Share Price: IRFC शेअर्स आज रॉकेट….पटकन वाचा तज्ञांनी दिलेली रेटिंग
- Sigachi Share Price: एका आठवड्यात 43% ची तेजी! सुरुवातीलाच सिगाची इंडस्ट्रीज शेअर्स रॉकेट…SELL करावा का HOLD?
- गुंतवणूकदारांना 3 वर्षात दिला 1959.46% रिटर्न! आज मोठ्या तेजीचे संकेत…BUY करावा का?