विवाहितेच्या घरात जाऊन तिच्याशी अश्लिल वर्तन

अहमदनगर :- घरात झाेपलेल्या विवाहितेच्या घरात जाऊन तिच्याशी अश्लिल वर्तन केल्याची घटना स्टेशन रस्त्यावरील कोठी परिसरात मंगळवारी रात्री घडली.

याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी आकाश मनोज पोळ (२२, कोठी परिसर) याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

कोठे वाच्यता केल्यास मारहाण करण्याची धमकी आरोपीने महिलेला दिली. या प्रकरणी पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कैलास सोनार करत आहेत.