अहमदनगर :- अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणारा आरोपी तब्बल दोन वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागला.
आनंदा रामा दुणगे (२१, राहणार वाडेगव्हाण, ता. पारनेर) असे आरोपीचे नाव आहे. अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीने २०१७ मध्ये अल्पवयीन मुलीस पळवून नेले होते.
याप्रकरणी सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आरोपीचा शोध न लागल्याने हा गुन्हा मागील महिन्यात अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाकडे वर्ग करण्यात आला.
कक्ष निरीक्षक वसंत पथवे हे गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी पुण्यात हडपसर परिसरात असल्याची माहिती समोर आली.
आरोपी व पीडित मुलीचे मोबाइल लोकेशन शोधून पथवे यांच्या पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल कांबळे, महिला पोलिस नाईक रिना म्हस्के, मोनाली घुटे, सरोदे यांनी हडपसर येथे जाऊन आरोपीसह पीडित मुलीला ताब्यात घेतले.
- लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी ! ई केवायसी केलेली असतानाही हफ्ता का मिळाला नाही ? कारण समजून घ्या!
- ‘या’ तारखांना जन्मलेल्या लोकांना 2026 मध्ये मिळणार अफाट यश ! यात तुमची पण जन्मतारीख आहे का ?
- फोन हरवल्यानंतर पहिल्या 15 मिनिटात ‘ही’ 5 कामे अवश्य करा !
- अमेरिकेच्या भूमिकेमुळे सोन्याच्या किमतीला ब्रेक ! चांदीचा भाव कसा आहे ?
- रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! मुंबईवरून ‘या’ शहरासाठी सुरू झाली नवीन एक्सप्रेस ट्रेन, 12 स्टेशनंवर थांबा मंजूर













