पारनेर : गाडी लावण्याच्या किरकोळ कारणावरून एकास दोघजणांनी कोयत्याने मारहाण केल्याची घटना पारनेर तालुक्यातील कोहकडी शिवारात घडली आहे. याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की, कोहकडी येथे सोन्याबापू वसंत घावटे वय ३२ वर्षे रा.घावटे मळा,जा.शिरूर यांच्यात व ज्यातिराम कारखिले,नवनाथ कारखिले रा.राळेगण थेरपाळ, ता.पारनेर यांच्यात गाडी लावण्याच्या कारणावरून वाद झाले.
या वादातून ज्यातिराम कारखिले याने घावटे यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून जखमी केले. तसेच इतर अनोळखी तिघांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. याबाबत सोन्याबापू वसंत घावटे यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांत फिर्यादी दिली.
- वंदे भारत स्लीपर ट्रेन होणार आणखी भव्य! प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे कोचसंख्या २४ वर, आसनक्षमतेत मोठी वाढ
- राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू
- अर्थसंकल्पाआधीच स्वयंपाकघराला झटका; खाद्यतेल दरवाढीने घरगुती बजेट ढासळले
- तत्काल तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल; आधार लिंक IRCTC खातं बंधनकारक, सामान्य प्रवाशांना दिलासा
- 756 कोटींचा धमाका! अहिल्यानगरचा विकास आता नवा टप्पा गाठणार…कसा ते वाचा













