अहमदनगर :- शहरातील गांधी मैदानाजवळील भगतगल्लीत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी बुधवारी रात्री छापा टाकला.
रॅकेट चालवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली असून तीन बळी महिलांची सुटका करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहराच्या विविध भागात सेक्स रॅकेट सुरू आहेत.
गांधी मैदानाजवळील भगतगल्लीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक मिटके यांना मिळाली. त्यांच्या पथकाने बुधवारी रात्री साध्या वेशात संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली.
त्यानंतर तेथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत एका महिलेला ताब्यात घेण्यात आले असून धंद्यासाठी आणलेल्या तीन महिलांची सुटका करण्यात आली.
- कमाईची संधी ! तज्ज्ञांनी सुचवलेले 3 मजबूत शेअर्स; जाणून घ्या सविस्तर
- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! अवघ्या तासाभरात सिंधुदुर्ग आणि गोवा; फक्त २,३०० रुपयांपासून हवाई प्रवास
- खंबाटकीचा नवा बोगदा जून २०२६ पासून खुला; पुणे-सातारा प्रवास अवघ्या ७ मिनिटांत, अपघातांना ब्रेक
- शेतकऱ्यांना फेब्रुवारीत मोठा दिलासा! पीएम किसानसोबत नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता
- लाडक्या बहिणींची संख्या पुन्हा घटणार? ‘या’ महिलांना योजनेतून अपात्र ठरवले जाण्याची शक्यता













