अहमदनगर :- लग्नाचे आमिष दाखवत विवाहितेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याप्रकरणी श्रीगोंदे तालुक्यातील घारगाव येथील योगेश शिंदे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडित महिला ही सध्या औरंगाबादच्या वाळुंज एमआयडीसी परीसरातील बजाजनगर सिडको येथे वास्तव्यास आहे.
योगेश सिद्धेश्वर शिंदे (रा. घारगाव,ता.श्रीगोंदा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
2017 ते दि. 20 जुलै 2019 दरम्यान नगरमधील तारकपूर, वाळुंज एमआयडीसी, पुणे जिल्ह्यातील शिरूर, वाघोली या भागात विवाहितेवर अत्याचार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
योगेश शिंदे याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे पतीपासून तिला पळवून आणले. नगरच्या तारकपूर आणि वाळुंज एमआयडीसी येथे तिला भाडोत्री खोली घेऊन दिली.
या खोलीत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तसेच रांजणगाव, कारेगाव, शिरूर येथील वेगवेगळ्या लॉजवर अत्याचार करण्यात आला.
- सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी ! एक डिसेंबर 2025 पासून ‘हे’ पाच नियम बदलणार
- पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी….! पुण्यातील ‘या’ मेट्रो मार्गाचा आराखडा झाला रद्द, कारण काय ?
- शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ दिवशी राज्यातील सर्व शाळा बंद ठेवल्या जाणार, कारण काय?
- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! एकाच दिवशी निघालेत 4 महत्वाचे शासन निर्णय, वाचा….
- प्रतीक्षा संपली ! अखेर महिंद्रा कंपनीची पहिली 7 सीटर इलेक्ट्रिक Mahindra XEV 9S SUV लॉन्च, मिळणार 500 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज













