पाथर्डी – तालुक्यातील 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे.
याबाबत पीडित मुलगी व तिच्या पित्याच्या जबाबावरून पाथर्डी पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा व ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील 17 वर्ष वयाची अल्पवयीन मुलगी शिक्षण घेत होती.
पोकलेन मशीनवर ड्रायव्हर असलेल्या सोपान प्रभाकर कदम (वय 24, रा. अडा ता. कळमनुरी, जि. हिंगोली) याने 13 जुलै रोजी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले व तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले.
याबाबत पीडित मुलीच्या व पित्याच्या जबाबावरून आरोपी सोपान कदम यांचे विरोधात भादवि कलम 363, 376, बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 चे कलम 3 व 4 सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
- आता फक्त 35 हजारात मिळणार नवा कोरा ट्रॅक्टर ! सरकार करणार मदत
- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे – जळगाव नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार, कसा असणार रूट?
- महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! आता ‘या’ लोकांचे जन्म – मृत्यू प्रमाणपत्र रद्द केले जाणार, कारण काय ?
- महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी फडणवीस सरकारचा नवा जीआर ! आता ‘हे’ एक काम केल्याशिवाय 1500 रुपये मिळणार नाही
- पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! परीक्षा शुल्कात झाली मोठी वाढ