जामखेड :- १२ खाती मी सांभाळल्यामुळे जिल्ह्यात कोणत्याच तालुक्याला मिळाला नाही इतका निधी कर्जत-जामखेड तालुक्यात आणला.
सावरगाव येथे सव्वासहा कोटींचा निधी विविध कामांसाठी दिला. काम न केल्याचे सिद्ध केले, तर निवडणुकीला उभा राहणार नाही. असे वक्तव्य पालकमंत्री राम शिंदें यांनी जामखेड येथे बोलताना केले.
पाच वर्षांच्या मंत्रिपदाच्या काळात प्रत्येक गावात विकासकामांसाठी निधी दिला. केलेल्या कामाचा प्रत्येक गावात फलक लावून हिशेब दिला.
आता ज्यांना उभे रहायचे आहे, त्यांनी काम केले असेल, तर त्याचा हिशेब द्यावा. त्यांनी केवळ दारू-मटनावर जोर दिला.
मलाही तसे करता आले असते, पण मी विकासाचा दृष्टीकोन पाहिला, असा टोला पालकमंत्री राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला.
सावरगाव येथे घाटमाथ्यावर वृक्षारोपण, नळपाणीपुरवठा योजना व विहिरीचे भूमिपूजन व वॉटर प्युरिफायरचे उदघाटन करताना शिंदे बोलत होते.
- राज्यात तयार होणार मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा 85 किलोमीटर लांबीचा नवा रेल्वेमार्ग !
- मोठी बातमी ! महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा, ‘या’ शहरात तयार होणार नवीन रेल्वेस्थानक
- तिरुपती बालाजीला जाणाऱ्या भक्तांसाठी गुड न्यूज ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून चालवली जाणार विशेष ट्रेन
- ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांना मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची भेट !
- ३२३ बोनस शेअर्सनंतर कंपनी आता गुंतवणूकदारांना देणार २४ मोफत शेअर्स !













