अहमदनगर :- मोबाइलमध्ये असलेले मुलीचे फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार नगरमध्ये घडला आहे.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून प्रवीण दिलीप जाधव याच्या विरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पीडित मुलगी व आरोपी हे शेजारी-शेजारी रहायला आहेत. ते एकमेंकाचे ओळखीचे असल्याने मुलीबरोबर आरोपीने फोटो काढले होते. याच फोटोंचा वापर करून आरोपीनी मुलीवर लैंगिक अत्याचार केले.
मुलीने शरिरसंबंधास नकार दिल्याने आरोपीने मोबाइलमध्ये असलेले दोघांचे फोटो व्हायरल करून करून बदनामी करेल, अशी धमकी देऊन अत्याचार केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
- महाराष्ट्रातील ‘या’ प्रसिद्ध बँकेतून आता ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत ! आरबीआयच्या नव्या निर्बंधांमुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा होणार ? 2026 शेतकऱ्यांसाठी ठरणार गेमचेंजर
- डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सोयाबीनच्या रेट मध्ये झाली मोठी घसरण ! आज बाजारात काय भाव मिळाला? वाचा
- मोठी बातमी ! शक्तीपीठ महामार्ग आणि कल्याण – लातूर महामार्ग ‘या’ ठिकाणी एकमेकांना जोडले जाणार, महामार्गाच्या अलाइनमेंट मध्ये महत्त्वपूर्ण बदल
- आजपासून पुढील 5 दिवस बँका बंद राहणार ! महाराष्ट्रातील बँका पण 4 दिवस बंद राहणार, वाचा सविस्तर













